आमच्या बद्दल

श्री स्वामी समर्थ
श्री दत्तगुरु अवतार जाहले
अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज शके १७७८ ललितापंचमी बुधवारी सायंकाळी अक्कलकोट येथील (इंग्रजी तारीख २२/०९/१८५६) खंडोबाचे देवळात प्रकट झाले. अक्कलकोट जि. सोलापूर, महाराष्ट्र येथे पुढील सुमारे २२ वर्षे श्री स्वामी समर्थ महाराजांनी (इंग्रजी तारीख ३०/०४/१८७८ पर्यंत) असंख्य लीला केल्या. देह सोडल्यावरही श्री स्वामी महाराजांनी 'हम गया नही जिंदा है' या ब्रम्हवाक्यातून आजही, जगातील विविध देशातील भक्तांना त्याची अनुभूती मिळत आहे, अशी त्यांनी ग्वाही दिली आहे. अशाच एका पुण्यातील भक्ताला स्वामी समर्थ महाराजांनी, मी पुण्यापासून जवळच पुणे-नाशिक हमरस्त्यावर, राजगुरुनगर गावापासून सुमारे ५ कि.मी. अंतरावर अवतरणार आहे. याची अनुभूती दिली.त्याचप्रमाणे ते सर्व कार्य करवून घेत आहेत, हि त्यांचीच लीला आहे. मुंबई-पुणे-नाशिक या त्रिकोणी प्रदेशातील श्री स्वामी समर्थांची अवतरणाची जागा हि अत्यंत मोक्याची आणि देवभूमी आहे. ती 'तपोवन' म्हणून ओळखली जाईल. ती नाथ संप्रदायातील श्री चर्पटीनाथांची तपोभूमी आहे. तेथे श्री रेणुकामातेचे वास्तव्य आहे. पंढरीच्या श्री विठोबाचे ते विसाव्याचे ठिकाण आहे.

योजना

याच तपोवनात श्री स्वामी समर्थ महाराजांचे मंदिर हे 'श्री स्वामी परमधाम' रूपाने साकारणार आहे. त्याच बरोबर हिमालयातील महान योगीराज श्री महाअवतार बाबाजींचे ध्यान मंदिर (प.पू. बाबाजींचे वास्तव्य हिमालयात असते, त्यांचे आजचे वय अंदाजे २००० वर्षे आहे. ते आजही अनेकांना सदेह दर्शन देतात) - नवग्रहमंदिर - नक्षत्रवाटीका - गोशाला - अन्नछत्र - वृद्धाश्रम - मोफत दवाखाना अशा प्रकारचे कार्य होणार आहे.

न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावकः | यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम || (श्रीमद् भगवत् गीता १५/६ )

अर्थात - जेथे अग्नी तसेच चंद्र व सूर्याचा प्रकाश पोहचू शकत नाही आणि जेथे पोहचल्यावर पुन्हा पुन्हा पुनरागमन होत नाही ते माझे धाम परमधाम आहे. अव्यक्त, अनंत, शाश्वत, अक्षर ब्रम्हाचे ते अधिष्ठान आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात ज्या सनातन, अव्यक्त आणि अक्षर भावाला प्राप्त करून मनुष्य जीवात्मा परत येत नाहीत, जन्म मरणाच्या चक्रात अडकत नाहीत तेच माझे परमधाम आहे. प्रत्यक्ष परब्रम्ह, परमात्मा, प्रत्यक्ष चैतन्य या तपोभूमीत अवतरणार आहे. आता ध्यानधारणा करायला हिमालयात, गिरनार पर्वत अथवा श्रीशैलमच्या अरण्यात जाण्याची आवश्यकता नाही. पुण्याजवळील राजगुरुनगर पासून जवळच तपोवनात या चैतन्याचे प्रकटीकरण होणार आहे. सर्वसामान्य माणसाला वेळेअभावी, पैशाअभावी अक्कलकोटला जाणे शक्य नाही त्यांना श्री स्वामी समर्थांचा सहवास मिळणार आहे. सध्याच्या या धकाधकीच्या काळात, कलियुगात केवळ 'श्री स्वामी समर्थांचे' नामस्मरणच मानवाला तारणार आहे. आपले रोजचे विहित कर्म सोडून, कामधंदा सोडून, कर्मकांडात अडकून माझ्या मागे या हे श्री स्वामी समर्थांना कदापि मान्य नव्हते. त्यांनी कार्मप्रधान जीवन प्रणालीची शिकवण सर्वसामान्यांना दिली.
मुख्य म्हणजे त्यांनी-

| अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते । तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् || (श्रीमद् भगवत् गीता ९ /22 )

या भूतलावरील जी व्यक्ती, जो कुणी मानव फक्त श्री स्वामी समर्थांना मनोभावे शरण जातो, त्याची सर्व चिंता श्री स्वामी महाराज वाहून नेतात. याची अनुभूती लाखो लोकांना प्रत्यक्षात आजही येत आहे आणि कायमस्वरूपी येणार आहे. केवळ यासाठीच हि श्री स्वामींची लीला म्हणावी लागेल कि आपल्या जवळ श्री महाराजश्री येत आहेत.

श्री स्वामी परमधाम (तपोवन)

हे एक आदर्श देवस्थान करावयाचे आहे. श्री स्वामी महाराजांच्या आज्ञेनेच हे सर्व कार्य सिद्ध होणार आहे. सर्वसामान्य भारतीय माणूस हा श्रद्धावान आहे. त्याच्या श्रद्धेशी खिलवाड सध्या चालू आहे. कर्मकांड,अंधश्रद्धा यात तो गुरफटला आहे. कुठल्याही मंदिरात जाऊन पहा सगळीकडे अस्वच्छता, मणी, माळा, फोटो, मूर्त्या, पेढे, बर्फी प्रसादाची अस्वच्छ दुकाने, मंदिराबाहेर घाणीचे साम्राज्य, प्लास्टिकची लॉकेट वेगवेगळी कवचे विकणारी दुकाने, स्टॉल यांची गर्दीच गर्दी!
अंधश्रद्धेचा बाजार!
तपोवनात या सर्वांना फाटा असेल. निर्मल, प्रासादिक, अध्यात्मिक, शांत वातावरणात नामस्मरण व ध्यानधारणेसाठी पवित्र वातावरण निर्मितीवर आपला संपूर्ण भर असणार आहे. या सर्व योजनांसाठी मनुष्यश्रमांचे पाठबळ अत्यावश्यक आहे. त्याबद्दलच्या आपल्या व्यक्तिगत संकल्पना, काही माहिती देवाण-घेवाण करायची असेल तर जरूर श्री स्वामी परमधाम (तपोवन) फेसबुक अथवा ईमेलवर संपर्क करावा.

ठिकाण

पुणे-नाशिक हमरस्त्यावर राजगुरुनगर पासून ५ कि.मी. पुण्यापासून सुमारे ५० कि. मी. अंतरावर हमरस्त्याला लागुनच सह्याद्रीच्या कुशीत प्रचंड मोठा जलाशय आहे. त्याचे कडेला एका दरीमध्येच 'तपोवन' वसलेले आहे. वैश्विक उर्जेचा स्त्रोतच तेथे आहे. आजूबाजूच्या जंगलाच्या पार्श्वभूमीवर हि हिमालयातील देवभूमीच वाटते. प्रत्यक्ष हिमालयात जायला ज्यांना वेळ नाही, पुणे-मुंबई-नाशिक पासून काही तासातच पोहचता येते. सकाळी निघून ध्यान धारणा करून संध्याकाळी घरी परत येण्या जोगी जागा श्री स्वामी समर्थ महाराज आणि श्री महाअवतार बाबाजींनी निवडली आहे. तेच ते
'श्री स्वामी समर्थ परमधाम' बनणार आहे. हि श्री स्वामी महाराजांचीच इच्छा!

सामाजिक गरज

स्वामी महाराजांच्या छत्रछायेत वावरणाऱ्या आम्हा सर्व लेकरांवर स्वामी महाराजांची सदैव कृपादृष्टी असावी. त्याचप्रमाणे श्री स्वामी परमधामाचे परिसरात कोणीही उपाशी राहू नये म्हणून अन्नछत्र चालू करणे, गोशाळेत कसायांकडून सोडवून आणलेल्या गाईंचे पालन करणे, वृद्धांची सेवा करणे, मोफत दवाखाना चालविणे हीच खरी ईश्वर सेवा आहे. श्री स्वामी महाराजांच्या छत्रछायेत विसावा घेण्यासाठी 'श्री स्वामी परमधाम तपोवन' सारखी दुसरी भूमी नाही. यासाठी सर्व श्री स्वामी समर्थ भक्तांना जाहीर आमंत्रण आहे.
सध्या कलियुगात अधर्म खूप वाढलेला आहे. प्रत्येकजण कुठल्या न कुठल्या प्रश्नाने ग्रासलेला आहे. त्याला योग्य मार्गदर्शन पाहिजे आहे. परंतु प्रत्येक ठिकाणी पैसा लागतोय, निरपेक्ष भावना कोठेच नाही. लग्न होत नाही म्हणून प्रश्न आहे, लग्न झाल्यावरचे अनेक प्रश्न आहे. मुल होत नाही म्हणून प्रश्न आहेत, तर मुलांचे प्रश्न आई वडिलांची डोकेदुखी ठरत आहे. नौकरी-धंदा नाही म्हणून प्रश्न, तर नोकरीतले वेगळे प्रश्न आहेत. पैसा नाही म्हणून प्रश्न, तर असंख्य पैश्यामुळे निर्माण होणारे असंख्य प्रश्न श्रीमंतांना सतावत आहेत. लोकांना वाटते कि परमेश्वराची अवकृपा, वक्रदृष्टी, कोप, शाप यामुळे हे भोगावे लागते, तर ते सर्व झूट आहे. प्रत्येक माणूस आपल्या मागील जन्मातील कर्मांची फळे भोगत असतो. विश्वास ठेवा अगर नका ठेऊ परंतु हे दाहक वास्तव्य आपण सर्वांनाच पचवावे लागत आहे. अल्ला, ईश्वर, गॉड हे एकाच परब्रम्ह परमात्म्याची रूपे आहेत. ती ईश्वर शक्ती एकच आहे. ती जात, पात, धर्म, पंथ यात बांधता येत नाही.
कलियुगात माणसाला तारणारी एकमेव शक्ती श्री स्वामी समर्थ रूपाने भारतातील अक्कलकोट गावात प्रकट झाली आणि नुसत्या स्मरणाने जगातील कुठल्याही जागी ती वैश्विक शक्ती (cosmic energy) फक्त केवळ स्मरणाने प्रकट होते. ७०० वर्षापूर्वी श्रीपाद श्री वल्लभांनी सांगितले होते कि मी पुढे कारंजा (लाड) येथे श्री नृसिंह सरस्वती नावाने अवतार घेईल आणि नंतर गन्धर्वपूर (गाणगापूर) येथे कार्य संपवून पुढे अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ नावाने भक्तांसाठी कार्य करेल. श्री स्वामी महाराज केवळ दत्तावतारच नव्हे तर ते देवाधिदेव महादेव, गणाधिपती श्री गणेशाचे तसेच सृष्टीचे पालनकर्ता भगवान श्री विष्णूचे पण रूप आहेत. या दिव्यशक्तीला कोण्या एका रूपाच्या बंधनात अडकवून ठेवता येणार नाही.

इतिहास

मानवी योनीत जन्म घेतल्यावर निसर्गाचे सर्व कायदेकानून प्रत्यक्ष परमेश्वराला देखील लागू होतात. प्रत्यक्ष भगवान विष्णूंचा अंश, राम अवतारात वनवास चुकू शकला नाही, आई वडिलांचा वियोग, रानोमाळी भटकंती, वनवास, युद्ध, पुत्रसौख्य नाही, काय काय भोगावे लागले! प्रत्येक्ष भगवान श्रीकृष्ण पाठीराखे असताना पांडवांना देखील वनवास चुकवता आला नाही. तेथे पण भगवंताचा वशिला चालला नाही. आपण तर मर्त्य मानव! कलियुगात दुखः पचविण्याची शक्ती फक्त नामस्मरणातच आहे. श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण आणि त्यांना पूर्ण अर्थाने शरण गेल्यावरच या संसाराच्या राहटगाडग्यातून सुटका होणार आहे.
डॉ. अॅनी बेझंट यांनी थिऑसॉफिकल सोसायटी तर्फे अमेरिकेतील कर्नल एच.एस. अलकॉट यांना १८७९ च्या सुमारास भारतात पाठविले होते. भारतातील साधू संतांची ओळख जगाला व्हावी हा उद्देश होता. त्यांनी ६ महिने अक्कलकोट येथे वास्तव्य केले व एक पुस्तक लिहिले. त्याचे नाव (seven stages of man ) यात त्यांनी कोडॅक कंपनीने काढलेले श्री स्वामी महाराजांचे फोटो छापले आहेत. आपल्या लोकसभेचे माजी सभापती कै.मावळंकर यांचे काका कै.दामोदारपंत मावळंकर यांनी ०४/0१/१८८० रोजी थिऑसॉफिस्ट मासिकात श्री स्वामी समर्थांचे चरित्र प्रसिद्ध केले. त्यानंतर खऱ्या अर्थाने श्री स्वामी समर्थ महाराज या भूतलावर प्रसिद्ध झाले. आपण जे परमेश्वराचे रूप डोळ्यांसमोर आणतो ते सगुण, साकार असे नव्हे. हि जी ईश्वरशक्ती आहे, त्याला कुठेही रूप नाही, आकार नाही. त्याचे वर्णन काही शब्दात करता येत नाही. ती अनुभूती प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळी येते ती कुठल्याही धर्म, पंथ, जात-पात विशिष्ट विचारप्रवाह यांची मक्तेदारी नव्हे. 'श्री स्वामी समर्थ महाराज' हे कुठेही प्रकट होतात. त्याच बरोबर हिमालयातील देवभूमीतील कालातीत श्री महाअवतार बाबाजी हे देखील भूतलावरील कुठल्याही भागात कुठेही प्रकट होतात.

महाअवतार बाबाजी

तामिळनाडूमधील चिदंबरम गावापासून १७ कि.मी. वर असलेल्या परंगपट्टाई या गावी इ.स. पूर्व २०३ - त्रिपुरारी पौर्णिमेला नोव्हेंबर महिन्यात एक नंबुद्री ब्राम्हण घराण्यात बाबाजींचा जन्म झाला. त्यांचे मूळ नाव नागराज. पुढे ते महाअवतार बाबा म्हणून प्रसिद्ध झाले. 'योगीकथामृत' (मूळ इंग्रजी पुस्तक Autobiography Of A Yogi) याचे हे मराठी रुपांतर ISBN 978 -1565692125 या ग्रंथात श्री योगानंद - श्री युक्तेश्वगिरी - श्री .लाहरीमहाशय - श्री महाअवतार बाबाजी हि गुरुशिष्य परंपरा व त्याबद्दल साविस्तर माहिती आहे. (१८२८ ते १९५१ पर्यंतचा कालखंड) त्याचप्रमाणे मराठीतील 'दिव्यस्पर्शी' (प्रसाद प्रकाशन, पुणे ) या डॉ. राम भोसले यांच्या चरित्रात उल्लेख आहे. १९४२ ते १९४८ पर्यंत डॉ. राम भोसले यांना बाबाजींचा सहवास लाभला डॉ. भोसले २३ फेब्रुवारी २००५ ला स्वर्गवासी झाले. तोपर्यंत मुंबईत बाबाजी त्यांना वरचेवर घरी येऊन दर्शन देत होते.
इंटरनेटच्या महाजालात http://en.wikipidea.org/wiki/mahaavtar_babaji वर पूर्ण माहिती मिळते. सुपरस्टार रजनीकांतलाही बाबाजी दर्शन देतात. याचाही उल्लेख या संकेतस्थळावर मिळतो.
श्री महाअवातर बाबाजींनी संदेश दिलेला आहे कि मला तुम्ही हिमालयात किंवा कुठल्याही मंदिरात शोधू नका. मी तुमच्या हृदयातच आहे. माझ्या दिशेने एक पाऊल टाका मी तुमच्या दिशेने दहा पाऊले पुढे येईन. असे हे अमर श्री महाअवतार बाबाजी त्यांची ध्यान धारणा करण्यासाठी श्री स्वामी समर्थ परमधाम तपोवनात बाबाजींचे ध्यानधारणा केंद्र सुरु होत आहे.

कार्यक्रम

स्वामी प्रकट दिवस सोहळा - नांदेड सिटी

दर वर्षी प्रमाणे २०१८ चा स्वामी प्रकटदिन सोहळा उत्तम पार पडला. या वर्षीच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी श्री मायकेल ट्रेमबाथ (ऑस्ट्रेलिया) होते. आरती आणि पूजा त्यांच्या हस्ते पार पाडली. या कार्यक्रमात श्री ट्रेमबाथयांच्या बरोबर श्री गुरुजी, श्री नरसिह लगड, श्री शिवदास सर्जे आणि इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

श्री यंत्र पुजा

महामेरू श्री यंत्र महालक्ष्मी पराविद्याचे साक्षात स्वरूप आहे. याची स्थापना केल्यास सैभाग्याचे दरवाजे खुले होतात. याची अधिष्ठात्री देवी श्री ललिता आहे. मान्यतेनुसार, जेव्हा सृष्टीमध्ये काहीच नव्हते तेव्हा देवी श्री विद्येच्या विचारातून एक मेरू उत्पन्न झाला. तोच मेरू 'श्री यंत्र; रूपात प्रसिद्ध झाला. यामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश सहित सर्व देवी-देवतांचा निवास आहे. याची पूजा केल्यास सर्व सुख प्राप्त होतात. या पूजे साठी श्रीमती शीलाअम्मा या आंध्रप्रदेश मधील देवीपुराम या देवस्थांतून आल्या होत्या. श्रीमती शीलाअम्मा या श्री विद्या ३० हुन अधिक वर्ष करण्यात माहीर आहेत. हि पूजा आंध्रप्रदेशानंतर पहिल्यांदाच पुण्यामधील श्री स्वामी समर्थ महाराज व श्री बाबाजी मठ , नांदेड सिटी येथे करण्यात अली.

विक्रेते आणि कार्यक्रम चौकशी